गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

Spread the love

वाई : सहकार क्षेत्राबरोबरच शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई यांच्यावतीने संस्थापक स्व. आनंद (अण्णा) कोल्हापूरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारा “सभासद पाल्य बक्षीस समारंभ” दि. १० जून २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता रमेश गरवारे सभाग्रह लोकमान्य टिळक ग्रंथालय , वाई येथे उत्साहात संपन्न होणार आहे.

संस्थापक स्व. आनंद (अण्णा) कोल्हापूरे यांनी सहकार, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्यातून समाजात प्रगती, गुणवत्ता आणि सेवाभावाचे संस्कार रुजविले. त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत उत्कर्ष पतसंस्था आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करत आहे.

शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा सन्मान करून त्यांच्या परिश्रमांना आणि गुणवत्तेला दाद देण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याने हा समारंभ विद्यार्थी आणि पालक यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा ठरणार आहे.

उत्कर्ष पतसंस्थेने गेल्या अनेक वर्षांत हजारो कुटुंबांशी विश्वासाचे नाते निर्माण केले असून सामाजिक उत्तरदायित्व जपत विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. यावर्षीही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा गौरव होणार असून हा सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरणार आहे.

या कार्यक्रमास सभासद, पालक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापूरे, तसेच उपाध्यक्ष ॲड. रामेश यादव, संचालक अमर कोल्हापुरे, मदन साळवेकर, डॉ. श्रीमती मंगला अहिवळे, श्रीकांत शिंदे , शरद चव्हाण , सलीमभाई बागवान, संजय वाईकर, सागर मुळे, वैभव फुले, भूषण तारू, श्रीमती अलका घाडगे, श्रीमती नीला कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Related Posts

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    Spread the love

    Spread the loveवाई : सोनगिरवाडी प्रभागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. वाई नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सावंत यांच्यावतीने सोनगिरवाडी येथील ज्योतिबा…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    Spread the love

    Spread the loveमांढरदेवी तालुका वाई येथील समाजभूषण कै. अशोक दादा जाधव यांच्या जयंतीनिमित्त अशोक जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने बावधन येथील जेष्ठ पत्रकार दिलीप जिजाबा कांबळे यांना विशेष सामाजिक योगदानाबद्दल समाजभूषण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    वाई तालुक्यातील उळूंब गावाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची गावभेट; ग्रामस्थांबरोबर साधला मनमोकळा संवाद…

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    माझा लेखन प्रवास