धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

Spread the love

वाई : धावडी येथील भीमसेवा मंडळाने पंचशील बौद्ध विहाराची देखणी वास्तू उभारली आहे. या प्रसन्न विहारात बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होणार आहे. नजिकच्या काळात येथे सुसज्ज अभ्यासिका उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे. आजवरच्या राजकीय वाटचालीत बौद्ध वस्तीतील नागरिकांनी मनापासून साथ दिली असल्याने इथल्या विकासकामांना लागेल तेवढा निधी देणार असल्याचे ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.

धावडी, ता. वाई येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पंचशील बौद्ध विहाराचे उदघाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी वाई पंचायत समितीच्या उपसभापती सौ. वर्षाताई जगताप, ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, धावडीच्या सरपंच वनिता ननावरे, बाजार समितीचे माजी संचालक विजयकुमार मांढरे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गंगावणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुणआप्पा मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. मकरंद पाटील पुढे म्हणाले, संपूर्ण जगभरात बुद्धांच्या शांततेचा मार्ग अनुसरला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांनी देशाला अमूल्य अशी राज्यघटना दिली. या महापुरुषांच्या विचारांना चालना देणारे आकर्षक बुद्ध विहार धावडी येथे उभारल्याने मनस्वी आनंद झाला आहे. विधायक कामासाठी निधी देण्यासाठी आपण कायम तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सतीश कुलकर्णी म्हणाले, छोट्याशा गावात बौद्ध विहारची सुंदर वास्तू कार्यकर्त्यांनी उभारली आहे. बाबासाहेबांचा विचार सर्वत्र पोहोचवणे हेच काम गेली अनेक वर्षे करत असल्याचे सांगत बौद्ध विहाराच्या कामाला मदत केल्याबद्दल त्यांनी ना. मकरंदआबा यांना धन्यवाद दिले. आजवर ज्या ज्या नेत्यांनी बौद्ध विहारांना मदत केली ते ते नेते सर्वोच्च पदावर पोहोचले अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

याप्रसंगी विहाराच्या बांधकामासाठी धम्मदान देणाऱ्या माहेरवाशीण महिलांना मंत्रीमहोदयांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तानाजी खंडागळे यांनी प्रास्ताविक केले. रमेश खंडागळे, शरद गंगावणे, दिलीप खंडागळे, स्वप्नील खंडागळे, हिरालाल गंगावणे, मिलिंद खंडागळे, तेजस्विनी खंडागळे, वंदना गंगावणे यांनी स्वागत केले. अशोक येवले यांनी सूत्रसंचालन तर रूपेश खंडागळे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास धावडी, पिराचीवाडी, गुंडेवाडी ग्रामस्थांसह भीमसेवा मंडळाचे कार्यकर्ते व महिला भगिनी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    Spread the love

    Spread the love वाई : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘आयएमए ‘ वाई शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश बाबर तर सचिव म्हणून डॉ. स्वप्निल मोतलिंग यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमास वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत…

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    Spread the love

    Spread the loveवाई : किसन वीर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे ज्येष्ठ व अभ्यासू प्राध्यापक डॉ. अर्जुन साहेबराव जाधव यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा सेवागौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थी आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित