वाई रोटरी क्लबचे उपक्रम प्रेरणादायी; प्रांतपाल सुधीर लातुरे यांच्याकडून गौरव

Spread the love

वाई : रोटरी क्लब ऑफ वाई हा रोटरी प्रांत ३१३२ मधील सर्वात कृतिशील क्लब असून, जागतिक सहयोगातून समाजाला गरजेचे आणि उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असल्याने त्यांचे उपक्रम सर्व क्लब व समाजसेवी संघटनांना प्रेरणादायी आहेत. अध्यक्ष रो. कुणाल शहा यांनी यावर्षी अनेक लोकोपयोगी प्रकल्प घेतल्याने असंख्य गरजूंचे आशीर्वाद त्यांना लाभणार आहेत, असे गौरवोद्गार रोटरी प्रांतपाल रो. सुधीर लातूरे यांनी येथे काढले. वाई रोटरी क्लबच्या प्रांतपाल भेटीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. पांडेवाडी येथील विष्णू श्रीपती जेधे यांना सेंद्रिय शेतीतील कार्याबद्दल तर गंगापुरी येथील सुनिल सर्जेराव कदम यांना प्रतिकूल परिस्थितीतही स्वावलंबी जीवन जगल्याबद्दल व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रांतस्तरीय पुरस्कारांमध्ये पाचवडच्या सौ. प्रतिभा अतुल खरात यांना ‘आत्मनिर्भर पुरस्कार’ आणि श्री. स्वानंद सुभाष कुलकर्णी यांना ‘रोटरी सक्षम पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ अंतर्गत सौ. बेला रिजवान शेख (सेंट थॉमस स्कूल), श्री. लालासो एकनाथ शिंदे (मुकाईदेवी माध्यमिक विद्यालय, वाशीवली), श्री. प्रताप श्रीपती यादव (त. ल. जोशी विद्यालय), श्री. रोहिदास नारायण भोसले (जि. प. हायस्कूल, महिगाव) आणि श्री. उमाकांत कडू कोळी (द्रविड हायस्कूल) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मुकाईदेवी हायस्कूल, वाशीवली येथील गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच ‘प्रोजेक्ट दृष्टी’ अंतर्गत १२०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. उदयोन्मुख धनुर्विद्या खेळाडू तनिष अमर वाघ याला सरावासाठी आर्चरी साहित्य देण्यात आले. यावेळी रो. डॉ. मिलिंद शहा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष रो. कुणाल शहा यांनी वर्षभरातील प्रकल्पांचा आढावा सादर केला, तर सचिव रो. अनुपम गांधी यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपाली अभ्यंकर यांनी केले. कार्यक्रमास वाई शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    Spread the love

    Spread the loveवाई : सोनगिरवाडी प्रभागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. वाई नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सावंत यांच्यावतीने सोनगिरवाडी येथील ज्योतिबा…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    Spread the love

    Spread the loveवाई : सहकार क्षेत्राबरोबरच शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई यांच्यावतीने संस्थापक स्व. आनंद (अण्णा) कोल्हापूरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारा “सभासद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    वाई तालुक्यातील उळूंब गावाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची गावभेट; ग्रामस्थांबरोबर साधला मनमोकळा संवाद…

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    माझा लेखन प्रवास