“गाणी हरिबाईची” हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

Spread the love

वाई : जात्यावरच्या ओव्या, पाळणे, उखाणे, अंगाई गीते ही गाणी लोकसाहित्याची अक्षरलेणी आहेत. ग्रामीण भागातील स्त्रियांनी या गाण्यांचे जतन आणि संवर्धन केले. त्या खऱ्या लोकसंस्कृतीच्या निष्ठावंत उपासक आहेत. ‘हरिबाईची गाणी’ हा गीत संग्रह लोकसंस्कृतीचा अमृत कुंभ आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.

“गाणी हरिबाईची” या गीतसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव मस्कर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, हरिबाई शिंदे, तानाजी शिंदे, नामदेव शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे पुढे म्हणाले, कोविडच्या काळात सगळं जग एका जागेवर थांबले असताना, हरिबाईचे सुपुत्र तानाजीराव शिंदे यांनी आपल्या आईला गाते केले. आईच्या ओव्यांमध्ये त्यांना सांस्कृतिक ऐश्वर्य आणि आंतरिक सामर्थ्य जाणवले. आईने अनेक वर्षे काळजात जपून ठेवलेल्या ओव्यांचे त्यांनी शब्दांकन आणि संकलन करून काळजातली गाणी कागदावर उतरवली. जाते हे केवळ धान्य दळण्याचे साधन नाही, तर ते लोकसंस्कृतीचे जागृत विद्यापीठ आहे. जात्यावरच्या ओव्यांतून स्त्री मनाच्या व्यथावेदनांचं, सुखदुःखाचं, देव देवतांचं आणि लोकपरंपरांचं प्रत्ययकारी दर्शन घडते. सध्या आधुनिक काळात हा लोकसंस्कृतीचा ठेवा दुर्लभ होत चालला आहे.तानाजीराव शिंदे यांनी आईच्या अनंत आठवणींना आणि ओव्यांना ग्रंथाचे कोंदण देऊन मातृभक्तीचा आदर्श घालून दिला आहे. हा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील तरुणांनी परंपरेने चालत आलेला लोकसंस्कृतीचा वैभवशाली वारसा जपला पाहिजे.

यावेळी बोलताना महादेव मस्कर यांनी आईच्या मुखातून आलेल्या ओव्या, पाळणे आणि जात्यावरची गाणी हा अमूल्य ठेवा पुस्तकरूपात आणून तानाजीराव शिंदे यांनी वेगळा आदर्श घालून दिल्याचे सांगितले. यावेळी चंद्रकांत जाधव यांनीही आपल्या मनोगतात माय लेकराच्या या अनोख्या नातेसंबंधावर प्रकाश टाकला. श्रीमती जयश्री शिंदे यांनी आपल्या मनोगतात हरिबाई यांच्या मिश्किल स्वभावाबाबरोबरच नातेसंबंधातील विविध पैलूंना उजाळा दिला.

प्रास्ताविकात बोलताना तानाजीराव शिंदे म्हणाले, आई सोबत गप्पा मारत तिच्याकडून या ओव्या, पाळणे आणि गाणी ऐकून त्या पुस्तक रूपात प्रकाशित करण्याची संकल्पना सुचली. कोविडच्या काळात या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. याकामी पाटणे सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रतिक कालेकर यांनी मुखपृष्ठ आणि पुस्तकाची अंतर्गत सजावट यासाठी बहुमोल योगदान दिले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आम्हा भावंडांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या आईच्या गळ्यातून आलेला प्रत्येक स्वर प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी गायक मच्छिंद्र नलावडे आणि तेजस्विनी पोरे यांनी पुस्तकातील पाळणा, ओव्या सुरेल स्वरात सादर केली. सूत्रसंचालन केशव कोदे आणि अशोक येवले यांनी केले. अजिंक्य शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    माझा लेखन प्रवास

    Spread the love

    Spread the love वाई नगरपालिका शिक्षण मंडळ कार्यक्षेत्रात प्राथमिक शाळेतील गेली ३४ वर्षांचा माझा कार्यकाल एक सेवाव्रत शिक्षक म्हणून अतिशय आव्हानात्मक ठरणारा होता. चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीत न अडकता स्वतःचे वेगळेपण…

    धावडी येथील उद्योजकांचा, समाजसेवकांचा “धावडीरत्न” पुरस्काराने सन्मान

    Spread the love

    Spread the loveवाई : धावडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात गावातील उद्योजकांना तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना “धावडीरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वाई येथे १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान मानसिक आरोग्य व्याख्यानमाला; किसनवीर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचा उपक्रम

    अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने वाई येथे कार्यशाळा संपन्न

    अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने वाई येथे कार्यशाळा संपन्न

    प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाची उपयुक्तता जाणून घ्यावी : विवेक सावंत

    प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाची उपयुक्तता जाणून घ्यावी : विवेक सावंत

    “गाणी हरिबाईची” हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

    “गाणी हरिबाईची” हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील