डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

Spread the love

वाई : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘आयएमए ‘ वाई शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश बाबर तर सचिव म्हणून डॉ. स्वप्निल मोतलिंग यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमास वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी आपल्या मनोगतात नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले, वाईकरांना चांगल्या उपचार सुविधा देण्यासाठी आयएमएने पुढाकार घ्यावा, पालिका जागा व अन्य सुविधा उपलब्ध करून देईल. डॉक्टर्स सदनच्या निर्मितीसाठीही सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण आदलिंगे यांनी वैद्यकीय व्यवसायिकांचा अनुभव, ज्ञान आणि कौशल्य रुग्णांसाठी वरदान असल्याचे सांगून आयएमए लोकाभिमुख संघटना असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमात उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पोळ, खजिनदार डॉ. सिद्धांत कद्दू, कार्यकारिणी सदस्य डॉ. अर्चना लोखंडे, डॉ. समीर घोलप, डॉ. विराज येरामल्ला व डॉ.अभिषेक दबडे यांनी पदग्रहण केले. माजी अध्यक्षा डॉ. मंगला अहिवळे, डॉ. लता पाटील, डॉ.गजेंद्र पाटील, डॉ.उल्का कदम, डॉ.उल्का पोळ यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. स्वाती देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. स्वप्निल मोतलिंग यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेवक सचिन सावंत, डॉक्टर्स, वाईकर उपस्थित होते.

  • Related Posts

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    Spread the love

    Spread the loveवाई : किसन वीर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे ज्येष्ठ व अभ्यासू प्राध्यापक डॉ. अर्जुन साहेबराव जाधव यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा सेवागौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थी आणि…

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    Spread the love

    Spread the loveवाई : इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात नुकताच संपन्न झाला. दंतचिकित्सा क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ दंतवैद्य तसेच विविध सामाजिक व व्यावसायिक संस्थांचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित