वाई : धावडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात गावातील उद्योजकांना तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना “धावडीरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आरोग्यदूत मिलिंद शिंदे, कृषितज्ज्ञ अरुण आदलिंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उद्योजक चंद्रकांत मांढरे ( बापू) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सतीश मांढरे, राजेंद्र मांढरे, प्रमोद मांढरे, अनिल मांढरे, प्रशांत मांढरे, सौ. संगीता मांढरे, संजय अशोक मांढरे, सागर विश्वास मांढरे, अतुल धुमाळ, रुपेश खंडागळे, सोमनाथ क्षीरसागर, संतोष शिंदे, डॉ. पूजा मांढरे, ऋषिकेश पवार आदींना “धावडीरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मिलिंद शिंदे म्हणाले, धावडी गावातील उद्योजक गावाचे भूषण आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत राहून हे सारे गावाचा लौकिक वाढवत आहेत. कष्टाने आणि जिद्दीने त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव होत असल्याबद्दल त्यांनी डीपीएलच्या संयोजकांचे कौतुक केले. वैद्यकीय सहाय्यता कक्षातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीची माहिती त्यांनी दिली.
अध्यक्षीय मनोगतात अरुण आदलिंगे म्हणाले, सुवासिक बासमती भातासाठी प्रख्यात असणाऱ्या धावडी गावात गावातील उद्योजकांचा होत असलेला सन्मान कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाचे नेटकं संयोजन केल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
चंद्रकांत मांढरे यांनी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सचिन मांढरे यांनी आपल्या मनोगतात धावडी महोत्सवाच्या चर्चेतून धावडीरत्न पुरस्कार सोहळा साकार झाल्याची माहिती दिली. प्रास्ताविक मनोगतात संजय अशोक मांढरे यांनी धावडी प्रीमियर लीगच्या आयोजनाची माहिती दिली.
प्रारंभी प्रमुख पाहुणे आणि धावडी गावच्या सरपंच वनिता ननावरे, उपसरपंच पल्लवी मांढरे, ग्रामपंचायत सदस्य सीमा मांढरे, महेंद्र गंगावणे, गणेश भानुदास मांढरे आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी राकेश मांढरे, जितेंद्र मांढरे, सागर मांढरे, सचिन मांढरे, सागर विश्वास मांढरे, संजय अशोक मांढरे, नितीन माने, अनिल मांढरे, प्रशांत मांढरे आदींनी परिश्रम घेतले.
पुरस्कार सोहळ्यात ज्यांना ज्यांना सन्मानित करण्यात आले त्या प्रत्येकाची चित्रफित दाखवण्यात आली. पुष्पगुच्छ देण्याऐवजी प्रत्येकाला वृक्षरोप देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक येवले आणि दीप्ती साळुंखे यांच्या सुरेल गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास चंदरबापू मांढरे, ज्ञानोबा मांढरे, विलास मांढरे, धोंडीराम मांढरे, मनोहर मांढरे, विठ्ठल मांढरे, समाधान खंडागळे, मिलिंद खंडागळे यांचेसह ग्रामस्थ, महिला आणि खेळाडू मोठ्या संखेने उपस्थित होते.




