कृषी क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध : अरुण आदलिंगे

Spread the love

वाई : शाळा आणि मळा यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आता पालक आणि शिक्षकांवर आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी कृषी शिक्षणाची निवड करावी. कृषी क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन कृषी तज्ञ अरुण आदलिंगे यांनी केले.

वाई तालुक्यातील बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या शुभचिंतन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक चिंतामणी काटवटे (आयटीआय निदेशक सातारा) होते. यावेळी श्री. धनंजय हेंद्रे (उपनिदेशक आयटीआय सातारा ) यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. आदलिंगे म्हणाले, मुलांनी नाचण्याकडून वाचण्याकडे आले पाहिजे. ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यावर प्रकृती सुधारते त्याप्रमाणे महान संतांची चरित्रे वाचनात आल्यावर संस्कृती सुधारते. देशाप्रती कर्तव्य भावना जपली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. चिंतामणी काटवटे यांनी आयटीआय क्षेत्रातील नवीन कोर्सेस आणि उपलब्ध नोकरीच्या संधी याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती त्रिवेणी पुजारी यांनी करून दिला. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दादासाहेब बनसोडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु, अंजली बाबर हिने केले तर स्वागत कु. अंकिता पवार हिने केले. यावेळी श्री. शंकर दगडे, सौ. शिंदे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दहावीतील विद्यार्थी साईराज खरात याने आभार मानले.

  • Related Posts

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    Spread the love

    Spread the love वाई : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘आयएमए ‘ वाई शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश बाबर तर सचिव म्हणून डॉ. स्वप्निल मोतलिंग यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमास वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत…

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    Spread the love

    Spread the loveवाई : किसन वीर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे ज्येष्ठ व अभ्यासू प्राध्यापक डॉ. अर्जुन साहेबराव जाधव यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा सेवागौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थी आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित