Spread the love

वाई : वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच वाई, खंडाळा येथील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथील नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या विजयाचे औचित्य साधून रविवारी २६ एप्रिल रोजी वाईत ‘भव्य नागरी सत्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाईतील म. फुले भाजी मंडई परिसरात सायंकाळी ५ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या शुभहस्ते सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. याप्रसंगी सातारा जिल्ह्याचे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. मदनदादा भोसले, शशिकांत पिसाळ, जि. प. माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड, जि. प. माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, आनंदराव शेळके, डॉ. नितीन सावंत, अनुप सूर्यवंशी, अनिरुद्ध गाढवे, चैतन्य कुलकर्णी, धैर्यशील कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सभापती ऋतुजा शिंदे, तेजस्वीनी कदम, ऋषिकेश धायगुडे, लता कर्णे आणि जि. प. सदस्य दिलीप बाबर, पंचायत समिती सदस्यांमध्ये डॉ. सुरभी भोसले, सचिन भोसले, स्वप्निल गायकवाड, अर्चना यादव, अतुल पवार तसेच वाई नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, सभापती अपर्णा जमदाडे, केतकी मोरे (पाटणे), पद्मा जाधव (पाडळे), नूतन मालुसरे, डॉ. जागृती पोरे, प्रसाद बनकर, संग्राम सपकाळ, ज्योती गांधी, सचिन सावंत व दिपाली सावंत यांचा सत्कार होणार आहे. पाचगणी व महाबळेश्वर नगरपरिषदेचे लक्ष्मी कराडकर, विनोद बिरामणे, प्रसाद कारंजकर, अभिलाषा कराडकर, वैभव कराडकर आणि रवींद्र कुंभारदरे यांचाही या सोहळ्यात सत्कार होणार आहे.

हा विजय केवळ व्यक्तींचा नसून तो सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे, असे मत नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.