गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

Spread the love

वाई : सोनगिरवाडी प्रभागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. वाई नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सावंत यांच्यावतीने सोनगिरवाडी येथील ज्योतिबा मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास वाईनगरीचे नगराध्यक्ष अनिल सावंत, जि. प. सदस्य बापूसाहेब शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष डॉ. सतीश बाबर, नगरसेविका सौ. नूतन मालुसरे, सौ. दिपाली सावंत, सौ. सरिता सावंत, सौ. तेजल सावंत, सौ. दिपाली श्रीकांत सावंत, युवा नेते श्रीकांत सावंत, सागर शिंदे, सागर पवार, प्रकाश जाधव, लक्ष्मण सावंत, अर्जुन मगर, गणेश पवार, किरण भोसले सर, दस्तगीर बागवान, पत्रकार अतुल संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, पो. उपनिरीक्षक अमोल गवळी, जि.प. सदस्य बापूसाहेब शिंदे यांनी आपल्या मनोगतात नगरसेवक सचिन सावंत यांनी राबवलेला उपक्रम कौतुकास पात्र असल्याचे सांगितले. श्रीकांत सावंत यांनी आपल्या मनोगतात शाळेसंदर्भात विद्यार्थी आणि पालकांना कसलीही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली. प्रास्ताविकात बोलताना सचिन सावंत यांनी मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी राबवला जाणार असल्याची माहिती दिली.

सौ. तेजल सावंत यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. अशोक येवले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग, पाणी बॉटल आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. नगरसेवक सचिन सावंत यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपले विद्यार्थी, आपली जबाबदारी या कर्तव्य भावनेतून नगरसेवक सचिन सावंत यांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत केलेली आले. याकामी त्यांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी काढले

  • Related Posts

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    Spread the love

    Spread the love वाई : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘आयएमए ‘ वाई शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश बाबर तर सचिव म्हणून डॉ. स्वप्निल मोतलिंग यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमास वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत…

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    Spread the love

    Spread the loveवाई : किसन वीर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे ज्येष्ठ व अभ्यासू प्राध्यापक डॉ. अर्जुन साहेबराव जाधव यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा सेवागौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थी आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित