वाईत श्री समर्थ सदगुरू काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या अमृतमयी प्रवचन सोहळ्याचे आयोजन

Spread the love

वाई : सिद्धगिरी मठ, संस्थान कणेरी (कोल्हापूर) चे ४९ वे मठाधिपती श्री समर्थ सदगुरू काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या विशेष ‘अध्यात्म सोहळ्या’चे आयोजन बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी वाई येथील सिद्धनाथवाडी येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने वाई आणि पंचक्रोशीतील भाविकांना आध्यात्मिक विचारांची मोठी पर्वणी लाभणार आहे.

बुधवारी सायंकाळी ४ वाजता सांप्रदायिक भजनाने सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता स्वामी महाराजांचे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि दिंडीने भव्य स्वागत करण्यात येईल. यानंतर पाद्यपूजा आणि दासबोध वाचन पार पडणार असून सायंकाळी ६.३० वाजता स्वामींचे प्रवचन होईल.

प्रवचनानंतर आरती, दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धनाथवाडी येथील अंबिका मंदिरासमोर पार पडणाऱ्या या प्रवचन सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ मंडळ सिद्धनाथवाडी आणि श्री समर्थ सदगुरू काडसिद्धेश्वर गुरुभक्त, सातारा जिल्हा यांच्या वतीने या करण्यात आले आहे. या मंगलमयी सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Related Posts

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    Spread the love

    Spread the love वाई : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘आयएमए ‘ वाई शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश बाबर तर सचिव म्हणून डॉ. स्वप्निल मोतलिंग यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमास वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत…

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    Spread the love

    Spread the loveवाई : किसन वीर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे ज्येष्ठ व अभ्यासू प्राध्यापक डॉ. अर्जुन साहेबराव जाधव यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा सेवागौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थी आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित