वाई रोटरी क्लबचे उपक्रम प्रेरणादायी; प्रांतपाल सुधीर लातुरे यांच्याकडून गौरव

Spread the love

वाई : रोटरी क्लब ऑफ वाई हा रोटरी प्रांत ३१३२ मधील सर्वात कृतिशील क्लब असून, जागतिक सहयोगातून समाजाला गरजेचे आणि उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असल्याने त्यांचे उपक्रम सर्व क्लब व समाजसेवी संघटनांना प्रेरणादायी आहेत. अध्यक्ष रो. कुणाल शहा यांनी यावर्षी अनेक लोकोपयोगी प्रकल्प घेतल्याने असंख्य गरजूंचे आशीर्वाद त्यांना लाभणार आहेत, असे गौरवोद्गार रोटरी प्रांतपाल रो. सुधीर लातूरे यांनी येथे काढले. वाई रोटरी क्लबच्या प्रांतपाल भेटीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. पांडेवाडी येथील विष्णू श्रीपती जेधे यांना सेंद्रिय शेतीतील कार्याबद्दल तर गंगापुरी येथील सुनिल सर्जेराव कदम यांना प्रतिकूल परिस्थितीतही स्वावलंबी जीवन जगल्याबद्दल व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रांतस्तरीय पुरस्कारांमध्ये पाचवडच्या सौ. प्रतिभा अतुल खरात यांना ‘आत्मनिर्भर पुरस्कार’ आणि श्री. स्वानंद सुभाष कुलकर्णी यांना ‘रोटरी सक्षम पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ अंतर्गत सौ. बेला रिजवान शेख (सेंट थॉमस स्कूल), श्री. लालासो एकनाथ शिंदे (मुकाईदेवी माध्यमिक विद्यालय, वाशीवली), श्री. प्रताप श्रीपती यादव (त. ल. जोशी विद्यालय), श्री. रोहिदास नारायण भोसले (जि. प. हायस्कूल, महिगाव) आणि श्री. उमाकांत कडू कोळी (द्रविड हायस्कूल) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मुकाईदेवी हायस्कूल, वाशीवली येथील गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच ‘प्रोजेक्ट दृष्टी’ अंतर्गत १२०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. उदयोन्मुख धनुर्विद्या खेळाडू तनिष अमर वाघ याला सरावासाठी आर्चरी साहित्य देण्यात आले. यावेळी रो. डॉ. मिलिंद शहा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष रो. कुणाल शहा यांनी वर्षभरातील प्रकल्पांचा आढावा सादर केला, तर सचिव रो. अनुपम गांधी यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपाली अभ्यंकर यांनी केले. कार्यक्रमास वाई शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    किसन वीर महाविद्यालयात लोकनेते स्व. प्रतापराव भोसले यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ खंड-१ गौरवग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

    Spread the love

    Spread the loveवाई : जनता शिक्षण संस्था, वाई संचलित किसन वीर महाविद्यालयात आदरणीय प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ खंड १ गौरवग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित…

    वाई येथे १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान मानसिक आरोग्य व्याख्यानमाला; किसनवीर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचा उपक्रम

    Spread the love

    Spread the loveवाई, दि. १४ : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या तीन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    किसन वीर महाविद्यालयात लोकनेते स्व. प्रतापराव भोसले यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ खंड-१ गौरवग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

    किसन वीर महाविद्यालयात लोकनेते स्व. प्रतापराव भोसले यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ खंड-१ गौरवग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

    वाई येथे १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान मानसिक आरोग्य व्याख्यानमाला; किसनवीर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचा उपक्रम

    अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने वाई येथे कार्यशाळा संपन्न

    अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने वाई येथे कार्यशाळा संपन्न

    प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाची उपयुक्तता जाणून घ्यावी : विवेक सावंत

    प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाची उपयुक्तता जाणून घ्यावी : विवेक सावंत

    “गाणी हरिबाईची” हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

    “गाणी हरिबाईची” हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

    डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग